कसारा घाट अपघात : सहा गाड्या रद्द तर सात गाड्यांचा मार्ग बदलला

0

कसारा-उंबरमळी स्थानकांदरम्यान ओएचई व्हॅन रुळांवरुन घसरली

भुसावळ- कसारा घाटातील अपघातामुळे रेल्वे प्रशासनाने सात गाड्यांच्या मार्गात बदल केला असून सहा गाड्या प्रशासनाने रद्द केल्याने प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. रद्द करण्यात आलेल्या गाड्यामध्ये कुर्ला-मनमाड गोदावरी एक्स्प्रेस (दोन्ही बाजूकडील), मनमाड येथून सुटणारी राज्यराणी एक्स्प्रेस, मुंबई-भुसावळ डाऊन तसेच मुंबई-मनमाड पंचवटी एक्स्प्रेस या सहा गाड्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे हाल झाले. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील कसारा ते उंबरमाळी रेल्वे स्थानकांदरम्यान शुक्रवारी पहाटे ओएचई दुरूस्त करणार्‍या व्हॅनला (टॉवर वॅगन) मालगाडीची धडक लागल्याने व्हॅन रूळावरून खाली उतरली. या गाडीला रूळावर चढवण्यासाठी रेल्वे प्रशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न केले. मात्र, यामुळे मुंबईकडून येणार्‍या व मुंबईकडे जाणार्‍या रेल्वे गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला. याच कारणामुळे सात रेल्वे गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला, तर सहा रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या. पाच गाड्यांना अर्ध्यातूनच माघारी वळवण्यात आले. तर तीन गाड्या कुर्ला येथूनच विलंबाने सोडण्यात आल्या, अशी माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली. या सर्व प्रकारामुळे भुसावळ विभागातील प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले.

या गाड्या कल्याण, पुणे, दौंड मार्गे
कसारा घाटातील अपघाताच्या पार्श्वभुमीवर मुंबईकडून येणार्‍या रेल्वे गाड्यांमध्ये मुंबई-हावडा गितांजली एक्स्प्रेस, मुंबई-नांदेड तपोवन एक्स्प्रेस आणि पुणे-भुसावळ हुतात्मा एक्स्प्रेस या गाड्या कल्याण, कर्जत, पुणे, दौंड मार्गे मनमाड येथे येथून पुढे भुसावळकडे मुख्य मार्गावर धावल्या.

सहा गाड्या केल्या रद्द
कसारा घाटातील अपघातामुळे रेल्वे प्रशासनाची एकच तारांबळ उडाली. सात गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला, तर सहा रेल्वे गाड्या रेल्वे प्रशासनाने रद्द केल्या. यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. रद्द करण्यात आलेल्या गाड्यामध्ये कुर्ला-मनमाड गोदावरी एक्स्प्रेस (दोन्ही बाजूकडील), मनमाड येथून सुटणारी राज्यराणी एक्स्प्रेस, मुंबई-भुसावळ डाऊन तसेच मुंबई-मनमाड पंचवटी एक्स्प्रेस या सहा गाड्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे हाल झाले.

कुर्ला गोरखपूर, कामायनी एक्स्प्रेसला 2 तास विलंब
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील कसारा ते उंबरमाळी रेल्वे स्थानकांदरम्यान शुक्रवारी पहाटे ओएचई दुरूस्त करणार्‍या व्हॅनला (टॉवर वॅगन) मालगाडीची धडक लागल्याने व्हॅन रूळावरून खाली उतरली. या गाडीला रूळावर चढवण्यासाठी रेल्वे प्रशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न केले. मात्र, यामुळे मुंबईकडून येणार्‍या व मुंबईकडे जाणार्‍या रेल्वे गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला. याच कारणामुळे सात रेल्वे गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला, तर सहा रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या. पाच गाड्यांना अर्ध्यातूनच माघारी वळवण्यात आले. तर तीन गाड्या कुर्ला येथूनच विलंबाने सोडण्यात आल्या, अशी माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली. या सर्व प्रकारामुळे भुसावळ विभागातील प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले.

या गाड्या विलंबाने
अपघाताचा परिणाम कुर्ला येथून सुटणार्‍या रेल्वे गाड्यांवर झाला. कुर्ला येथूनच तीन गाड्या रेल्वे प्रशासानने नियोजित वेळेपेक्षा शुक्रवारी विलंबाने सोडल्या. या उशिरा सोडण्यात आलेल्या रेल्वे गाड्यांमध्ये कुर्ला-गोरखपूर सुपरफास्ट ही गाडी दोन तास, पवन एक्स्प्रेस 1.45 तास, तर कामायनी एक्स्प्रेस 2 तास, या गाड्यांचा समावेश आहे.