कसोटीवर बांगलादेशाची मजबूत पकड

0

ढाका । बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामधील पहिल्या कसोटी सामन्यात सामान्य बांगलादेश संघाने सामन्यावर चांगली पकड ठेवलेली दिसून येत आहे. बांगलादेश संघाचे 264 धावांच्या आघाडीचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलिया संघाचे पाय गडगडताना दिसून येत आहे. अवघ्या 35 धावांत ऑस्ट्रेलियाचे 2 गडी स्वस्तात बाद झाले आहे. तत्पूर्वी, बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 260 धावा केल्या. त्यानंतर खेळायला आलेल्या ऑस्ट्रेलिया संघाचा डाव मात्र चांगलाच गडगडला. बांगलादेश गोलंदाजाच्या मार्‍यापुढे ऑस्ट्रेलिया संघ अवघ्या 217 धावांत गारद झाला. यामध्ये शकीब अल हसन याने 68 धावांमध्ये 5 खेळाडू तंबूत पाठवले. त्यामुळे पहिल्याच डावात बांग्लादेश संघाला 43 धावांची आघाडी मिळाली.

दुसर्‍या डावात बांगलादेशला म्हणावा असा खेळ करता आला नाही. ते दुसर्‍या डावात 10 खेळाडूच्या बदल्यात अवघे 221 धावा जमवू शकले. यामध्ये सर्वाधिक तमिम इक्बाल याने एकेरी झुंज देत 155 चेंडूत 78 धावा काढल्या आहेत.