ढाका : इंग्लंडविरुद्धच्या मालिकेनंतर भारतीय संघ आता बांगलादेशविरुद्ध एकमेव कसोटी सामना खेळणार आहे. भारताविरुद्ध होणाऱ्या एकमात्र कसोटी क्रिकेट सामन्यासाठी बांगलादेशाने बुधवारी आपला संघ जाहीर केला. भारतात हैदराबाद येथे ९ फेब्रुवारीपासून हा सामना होणार आहे. बांगलादेशने फलंदाज लिटॉन दास याला बांगलादेशाने या सामन्यासाठी पुनरागमनाची संधी दिली.
न्यूझीलंडविरुद्धच्या ख्राईस्टचर्च येथील कसोटी सामन्यात जखमी झालेल्या मुशफिकूर रहिम, मोमिनुल हक आणि इम्रूल कायेस या तिघांसह शफिउल इस्लाम यालाही या दौऱ्यासठी निवडण्यात आले आहे. न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेल्या संघातील नझमूल हुसेन शांतो, मुस्तफीझूर रहमान, नुरुल हसन, रुबेल हुसेन या सर्वांना संघातून वगळण्यात आले आहे.
संघ – मुशफीकूर रहिम (कर्णधार), तमिम इक्बाल, साबीर रेहमान, महमुदुल्ला, शकिब अल हसन, मेहेदी हसन, तईजूल इस्लाम, कामरुल इस्लाम राबी, सौम्या सरकार, टस्किन अहमद, सुभाशिष रॉय, कावेल लिटॉन दास, मोमिनुल हक, शफिउल इस्लाम.