चोपडा । राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या एन.एम.एम.एस. परीक्षेत चोपडा येथील कस्तुरबा माध्यमिक विद्यालयाच्या 4 विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे. गुणवत्ता यादीत स्थान मिळविलेले 4 विद्यार्थ्यांना इयत्ता 9 वी ते 12 वी पर्यंतच्या शिक्षणासाठी प्रत्येकी चोवीस हजार रुपयाची मदत जाहिर करण्यात आली असून त्यांना ती शिष्यवृत्तीच्या स्वरुपात देण्यात येणार आहे.
दीड लाख उत्पन्न असणार्यांचा समावेश
इयत्ता 8 वी साठीच्या या परीक्षेसाठी ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न दीड लाखांपेक्षा कमी असते त्यांनाच या परीक्षेस प्रविष्ट करण्यात आले होते. अंतिम यादीमध्ये विद्यार्थ्यांमध्ये किरण संजय विसावे, नितेश संजय चव्हाण, तनूजा सूर्यकांत पाटील, प्रशिक विजय बाविस्कर यांचा समावेश आहे.
एकूण 17 विद्यार्थी निवडले
विद्यार्थ्यांना कस्तुरबा माध्यमिक विद्यालयाचे एकूण 17 विद्यार्थी निवडले असून एकूण 4 लक्ष 8 हजार रुपयांची शासनाची शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना जे आर पाटील या शिक्षका शाळेचे शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. अभिनंदन संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष अॅड.श्री.संदीपभैय्या पाटील, सचिव डॉ.स्मिता पाटील, उपाध्यक्ष सुशिला महाजन, आर.डी.साठे, पर्यवेक्षक जी.जे.शिंदे यांनी केले.