कस्तुरबा विद्यालयात ‘एक सूर, एक ताल’ अभिनव उपक्रम

0

चोपडा । राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्रभक्तीवर आधारीतएक ‘सूर एक एक ताल‘चा अभिनव उपक्रम येथील कस्तुरबा माध्यमिक विद्यालयात घेण्यात आला. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.सुरेश पाटील यांच्याहस्ते कार्यक्रमास सुरुवात झाली. युवक बिरादरी ही संस्था राष्ट्रीय पातळीवर 1975 पासून राष्ट्रीय एकात्मतेवर आधारीत विविध भाषांमधील गीत विद्यार्थ्यांकडून म्हणून घेत भाषा-भाषा मधील मतभेद मिटवून आपण सारे एक असल्याचे दाखवीत युवकांसाठी सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम राबवित आहे. आतापर्यंत 30 लाख विद्यार्थ्यापुढे हा अभिनव अनुभव या कार्यक्रम सादर करण्यात आला आहे.

पर्यावरणासाठी केली जागृती
येथील कस्तुरबा विद्यालयात आज ‘एक सूर एक ताल’ एक दिवसीय कार्यशाळेत पर्यावरण जागृतीवर ‘हा नाश थांबवा, भु मातेचे तन मन जळते आहे, इतनी शक्ती हमे देना दाता, इक बाग है दुनिया, नमन करो मन, तसेच महात्मा गांधींचे लोकप्रिय ‘वैष्णव जण तो तेणे कहीये जेष, ढोलीया वे ढोलीया ओ मेरे बेलिया, अमे गीत गगन नां गांशु, धन धान्य पुष्प भरी वसुंधरा, असे विविध मराठी, गुजराथी, हिंदी, तामिळ, कन्नडी, पंजाबी, बंगाली, आसामी, सहारा अशा विविध भाषांमधील गीत विद्यार्थ्यांसमोर अमरावती येथील युवक बिरादरीचे गायक अतुल सुंदरकर, सुरेश रत्नपारखी, सार्वजित मौर्य, पुण्यवर्धन, स्वप्नील सारथी यांच्या टीमने म्हणून विद्यार्थ्यांकडूनही वदवूनही घेतले संगीत हे एक औषध आहे. त्याच्यात जादू आहे असे म्हटले जाते ते खरोखर करून दाखविले, विद्यार्थी कार्यक्रमात मंत्रमुग्ध होऊन कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा सहभाग
कार्यक्रमात कस्तुरबा विद्यालय, महात्मा गांधी माध्यमिक विद्यालयाच्या हजारो विद्यार्थ्यानी सहभाग घेतला होता. दिवसभर चाललेल्या या ‘एक सूर, एक ताल‘च्या कार्यशाळेचा समारोप संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष अ‍ॅड.संदीपभैया पाटील, सचिव डॉ. स्मिताताई पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी कस्तुरबा माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आर.डी.साठे, महात्मा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक एन.एस. सोनवणे सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवला होता.