धुळे : कस्तुरबा सोलर खादी महिला समिती, अमरावती व महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने धुळे जिल्हाधिकारी कार्यालय आवारात लावण्यात आलेल्या खादी उत्पादन स्टॉलचे उदघाटन जिल्हाधिकारी दिलीप पांढरपटटे यांच्या शुभहस्ते सकाळी 11.30 वाजता करण्यात आले.
खादी उत्पादन स्टॉल दि.29/12/2016 ते दि.31/12/2016 या कालावधीत सकाळी 10 ते सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. तरी खादी उत्पादनाचा लाभ सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिकांनी घ्यावा असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, एस.डी.दळवी यांनी केले आहे.
याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, नायब तहसिलदार अरुण जोशी, व जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी एस.डी.दळवी, एस.डी.वानखेडे, ए.बी.चव्हाण, आर.जे.पाटील, आर.के.खेडकर तसेच नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.