कहर….शस्त्र प्रदर्शनातून पोलिसांसमोरूनच रिव्हॉल्वर लंपास

0

जळगाव- शहरातील काव्यरत्नावली चौकात पोलीस स्थापनादिनानिमित्त आयोजित शस्त्रप्रदर्शनातून एक रिव्हॉल्वर लंपास झाल्याचा प्रकार शुक्रवारी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास समोर आला. पोलिसांचा ताफा असताना या ठिकाणावरून ही रिव्हॉल्वर लांबविल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. रामानंद नगर पोलिसात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
पोलीस अधीक्षक दत्ता शिंदे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत या प्रइर्शनाचे आज उद्घाटन करण्यात आले. शहरात गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून आता चक्क पोलिसांच्या ताफ्यातून रिव्हॉल्वर लंपास झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या रिव्हॉल्वरची किंमंत अंदाजे 15-16 हजार असल्याचे सांगितले जात आहे.
सविस्तर वृत्त अंकात