काँक्रीटीकरणाच्या कामाची तपासणी करण्यासाठी घेतले नमुने

0

शिंदखेडा । शिंदखेडा शहरातील मुख्य रस्ता असलेला शिवाजी चौक ते भगवा चौक दरम्यान झालेल्या रस्ता कॉक्रेटीकरण्याचे कामाची तपासणी करण्यासाठी नाशिक येथील अधीक्षक अभियंता व गुणनियंत्रण पथक येऊन रस्त्यांचे नमुने गुणवत्ता तपासणीसाठी घेण्यात आली. शहरातील मुख्य रस्ता हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येतो. रस्त्यासाठी नामदार जयकुमार रावल यानीं 75लाख रुपये मंजुर करुन आणले होते. सदर रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असल्याची तक्रार अनेक दिवसापासुन शहरातील सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटना व पत्रकार करीत आहे आपले सरकार ह्या पोर्टल वर तक्रार देखील केल्या पण त्याला देखील थातुर मातुर उत्तर देऊन निकाली काढल्या. पण शहरातील सामाजिक कार्यकर्ते, संघटना व पत्रकार यांनी रस्त्यांचे निकृष्ठ झालेल्या कामाची चौकशी निपक्षपणे गुणनियंत्रण पथक यांचा कडून करण्यात यावी व साबांवि चे अधिकारी व ठेकेदार यांचा विरुध्द योग्य ती कार्यवाही करून ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्यात यावे अन्यथा जन आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता.

याची दखल घेत दि. 28 रोजी नाशिक येथील अधीक्षक अभियंता व गुण नियंत्रण पथक दाखल झाले व रस्त्यांची आठ ठिकाणाहून कॉक्रेट चे नमुने घेण्यात आली हे नमुने नाशिक येथे पाठवून 1 महिन्याचा आत नमुने तपासण्यात येतील असे सांगण्यात आले.