पुणे । निर्माते-दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या आगामी इंदू सरकार या चित्रपटामध्ये दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी व त्यांच्या कुटुंबीयांबद्दल आक्षेपार्ह दृश्य अथवा संवाद असल्यास त्याविरोधात आंदोलन करणार, असा इशारा पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने दिला आहे. यासंदर्भात शहर काँग्रेसच्या नेत्यांनी पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे.