घोषणाबाजीने शहर दणाणले
यावल– शेतकर्यांना सरसकट कर्ज माफी झालीच पाहिजे, शेतकरी धर्मा पाटील यांच्या कुटुंबियांना न्याय मिळालाच पाहिजे, पेट्रोलचे भाव कमी करावेत यासह विविध मागण्यासांठी यावल तालुका भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसच्या वतीने मंगळवारी सकाळी 11 वाजता शहरातील बोरावल गेट जवळील धनश्री चित्र मंदिरापासून बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. राज्य सरकारविरुद्ध मोर्चेकर्यांनी प्रचंड घोषणाबाजी केल्याने शहर दणाणले. माजी आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार रमेश चौधरी, जिल्हा परीषदेचे गटनेता प्रभाकर सोनवणे, मसाकाचे चेअरमन शरद महाजन, शेतकी संघाचे सभापती नरेंद्र नारखेडे, जिल्हा उपाध्यक्ष हाजी शब्बीर खान, शहराध्यक्ष कदीर खान, जलील पटेल, अमोल भिरूड, विवेक सोनार, अनिल जंजाळे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.