शहापूर । आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची पूर्वतयारीसाठी आणि उमेदवार नोंदणी आणि चाचपणीसाठी शहापूर तालुका काँग्रेस आयची पार्टीची महत्त्वाची बैठक शहापूरातील काँग्रेस कार्यालयात 10 सप्टेंबर रोजी रविवारी दुपारी साडेतीन वाजता आयोजित करण्यात आली आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक आरक्षण जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्षानी कंबर कसली आहे. त्यामुळे या निवडणुकीची पूर्वतयारीसाठी शहापूर येथे तालुका काँगेस अध्यक्ष महेश धानके यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात येणार आहे.
विविध विषयावर चर्चा
या बैठकीत शहापूर तालुक्यात 14 जिल्हा परिषद गट आणि 28 पंचायत समिती गणाची ही निवडणूक स्वबळावर लढवायची की समविचारी पक्षाशी आघाडी करायची यावर चर्चा करण्यात येणार आहे.
आगामी जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुकीत इच्छुक उमेदवारांची नोंदणी करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व जिल्हा पदाधिकारी, तालुका कार्यकारिणी, विभागीय अध्यक्ष, सेल अध्यक्ष, गण, गट अध्यक्ष, शहर अध्यक्ष यांनी ह्या बैठकीस उपस्थित रहावे असे आवाहन शहापूर काँग्रेसचे प्रसिद्धीप्रमुख अंकुश भोईर यांनी केले आहे.