जळगाव। मंगळवार 8 ऑगस्ट रोजी काँग्रेस भवनात शहर जिल्हाध्यक्ष डॉ. ए. भंगाळे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील, सचिव डी. जी. पाटील, शहर जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. राधेश्याम चोैधरी यानी पक्षांतर्गत निवडणुकीचे प्राथमिक सदस्य नोंदणी झालेल्या याद्या प्रसिद्ध केल्या. जिल्ह्यातील 20 ब्लॉकमधील 57 हजार 575 सदस्य तर जळगाव शहरातील 221 बूथवर 5575 सदस्य, तसेच पात्र उमेदवारांची यादी राज्याचे निवडणूक अधिकारी महेश जोशी यांनी मंजूर करुन त्यांच्याच आदेशाने या मंजूर याद्या जाहीर करण्यात आल्या.
महिना अखेर जिल्हानिवड
याच महिन्यात निवडणूकांचा पहिला टप्पा पार पडेल. त्यात तालुकास्तरीय निवडी होतील. महिनीअखेरीस जिल्हास्तरीय निवड कार्यक्रम सुरु होईल. यावेळी प्रमुख उपस्थितांमध्ये स्वामी रेनापूरकर,जळगाव शहर काँग्रेस, योगेंद्रसिंग पाटील हे होते. तर सरचिटणीस अजबराव पाटील, शाम तायडे, मनोज सोनवणे, संजय वराडे , ज्ञानेश्वर कोळी, कफील अहमद, जगदीश गाढे आदी हजर होते.