फैजपूर। येथील फैजपूर शहर विकास आघाडीचे गटनेते तथा काँग्रेस नगरसेवक कलिम खा हैदर खा मणियार यांना तीन अपत्ये असल्याची तक्रार शेख सादिक शेख हसन यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल केली होती. हि तक्रार मान्य करीत नगरसेवक कलिम खां मणियार यांना सहा वर्षासाठी 22 फेब्रुवारी 2017 रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी अपात्र ठरविले आहे. या निकालाविरोधात नगरसेवक कलिम खा मणियार यांनी मंत्रालयात अपील दाखल केले. त्या संदर्भात राज्यशासनाकडे सुनावणी झाली. यात राज्यशासनाने जिल्हाधिकारी यांचा आदेश कायम ठेवत अपील फेटाळले.
तिसरे अपत्याचा पुरावा नसल्याने आदेश रद्द
या निकालाविरोधात कलिम खा मणियार यांनी औरंगाबाद खंडपीठात रिपिटिशन क्र.7857/2017 दाखल केली. या संदर्भात अंतिम सुनावणी 13 जुलै रोजी न्यायाधीश सुनील देशमुख यांच्या पुढे झाली. यात कलिम खा हैदर खा मणियार यांच्या तिसर्या अपत्याची नोंदच रद्द झाल्यामुळे व तिसरे अपत्य असल्याचा कोणताही सबळ पुरावा आढळला नाही या निष्कर्षावर कलिम खा मणियार यांचे उच्चन्यायालय यांनी अपील मंजूर केले तसेच जिल्हाधिकारी व राज्यशासन यांचे आदेश रद्द बातल ठरविले.
समर्थकांमध्ये नवचैतन्याचे वातावरण
नगरसेवक कलिम खा मणियार यांच्यातर्फे अॅड. राजेन्द्र देशमुख, अॅड.निर्मल दायमा यांनी कामकाज पहिले तर सरकार पक्षातर्फे अॅड.तिवारी यांनी कामकाज पाहिजे. नगरसेवक कलिम खा मणियार यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांचे नगरसेवकपद कायम राहणार असल्याने त्यांचा समर्थकांमध्ये नवचैतन्याचे वातावरण आहे.