काँग्रेसच्या उमेदवाराला मदत करणार नाही

0

नवापूर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या बैठकीत निर्णय

नवापूर- नवापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका कार्यकर्ते व पदाधिकारी यांची अत्यंत महत्वाची बैठक नवापूर येथे माजी आमदार शरद गावित यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली त्या बैठकीत कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षावर तीव्र नाराजी व्यक्त केली लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला खालील कारणास्तव मदत न करण्याची भूमिका बैठकीत ठेवण्यात आली आहे.
आघाडीचा उमेदवार ठरविण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विश्वासात घेतले नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची कुठलीही दखल घेण्यात येत नाही. स्थानिक स्वराज्य संस्था व नगरपरिषद नवापूर येथे आमच्या सदस्यांना विश्वासात घेत नसून विकास कामांना काँग्रेस पक्षातर्फे सतत विरोध होतो. तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ताब्यात असलेल्या ५१ ग्रामपंचायत पैकी १५ ग्रामपंचायतीच्या विरोधात खोट्या तक्रारी करून चौकशी लावण्यात आली आहे. ,आजपर्यंत काँग्रेस पक्षाने तालुक्यातील कोणत्याही पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संपर्क केला नसून बैठकीत आमंत्रण देण्यात येत नाही. या कारणास्तव राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत असे प्रसिद्धीपत्रक नवापूर तालुका अध्यक्ष विनायक गावीत,तालुका युवक अध्यक्ष मनोज वळवी, विधानसभा अध्यक्ष सूनील वसावे ,जिल्हा सरचिटणीस अमृत लोहार,शहराध्यक्ष अतुल तांबोळी, जिल्हा युवक अध्यक्ष सुरज गावीत यांनी प्रसिध्दीस दिले असुन पत्रकावर त्यांचा सह्या आहेत.