पिंपरी : पिंपरी चिंचवड काँग्रेस पर्यावरण विभागाच्या अजमेरा येथील कार्यालयात काँग्रेसने मिळविलेल्या तीन राज्यातील विजयाचे पेढे वाटून आणि घोषणा देऊन जल्लोष करण्यात आला. तसेच, काँग्रेस पक्ष श्रेष्ठी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. यावेळी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पर्यावरण विभागाचे अध्यक्ष अशोक मोरे, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्ष निगार बारस्कर, अशोक मंगल, श्याम अगरवाल, जयराम शिंदे, सरिता जामनिक, दीपक थोरात, उमेश बनसोडे, राजेंद्र लोंढे (महाराज), संदेश नवले, आबा खराडे, नाझिया बारस्कर, वैशाली नलगे, जयश्री काननाइके उपस्थित होते.
हे देखील वाचा
विविध मंदिरांमध्ये अभिषेक कार्यक्रम…
तसेच, सोनिया गांधी यांच्या 72 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने दीर्घायुष्य लाभण्यासाठी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या मंदिरांमध्ये महाभिषेक करण्यात आले. सकाळी पर्यावरण विभागाचे अध्यक्ष अशोक मोरे यांच्याहस्ते कार्यकर्त्यांसह श्रीमंत दगडूशेठ हलवाई येथे महाभिषेक केला. तसेच महाराष्ट्राचे आराध्य जेजुरीच्या खंडोबा राया दैवत येथेही महाभिषेक पार पडला. पर्यावरण विभागाचे उपाध्यक्ष उमेश रानवडे यांंच्या वतीने आळंदीत अन्नदान आणि शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. तसेच काँग्रेस पक्ष पर्यावरण विभागाचे जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन याप्रसंगी झाले.