काँग्रेसच्या या नेत्याचे योगदान इतिहास कधीही विसरणार नाही – अनुपम खेर

0

मुंबई : ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ हा चित्रपट माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या जीवनावर आधारित असणार आहे. या चित्रपटात पंतप्रधान मनमोहन सिंगची भूमिका बॉलीवूडचा दिग्गज अभिनेता अनुपम खेर साकारणार आहे. या चित्रपटाचे शूटींग पूर्ण झाले आहे. काँग्रेसच्या या नेत्याचे योगदान इतिहास कधीही विसरणार नाही, असे अनुपम खेर यांचे म्हणणे आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात ते मनमोहन सिंग यांच्या लूकमध्ये क्लॅपबोर्ड पकडून उभे असलेले दिसतात.

 

अनुपम यांनी सुजान बर्नर्टचा एक फोटोदेखील शेअर केलाय. यात सुझान सोनिया गांधींची भूमिका साकारत आहे. ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ हा चित्रपट २१ डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.