काँग्रेसतर्फे बुधवारी महारॅली

0

जळगाव । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या नोटबंदीच्या निर्णयाला बुधवारी वर्ष पुर्ण होत असून या निर्णयामुळे देशातील आर्थिक व्यावस्था कोलमडली तसेच शेतकरी, व्यापारी व सर्वसामान्यांना याचा त्रास सहन करावा लागला आहे. त्यामुळे या निर्णयाच्या विराधोत बुधवारी दुपारी 2.30 वाजता जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी व जळगाव शहर काँग्रेस कमिटीतर्फे काँग्रेस भवन पासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत महारॅली काढण्यात येवून निषेध नोंदविण्यात येणार आहे.

या महारॅलीत जळगाव जिल्हयातील सर्व माजी खासदार व माजी आमदार, सर्व प्रदेश पदाधिकारी, काँग्रेस चे सर्व नेते,आजी माजी पदाधिकारी, तालुकाध्यक्ष, महानगर अध्यक्ष व कार्याध्यक्ष,पदाधिकारी व कार्यकर्ते, ब्लॉक/फ्रंटल/सेलचे अध्यक्ष, जि.प. व पं.स. सदस्य, नगरपालिका नगरसेवक, सहकार क्षेत्रातील आजी माजी पदाधिकारी, सदस्य तसेच सरपंच, ग्रा.पं.सदस्य आपले सर्व कार्यकर्ते सहभागी होणार असून त्यांना उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.