जळगाव । पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढी विरोधात काँगे्रसतर्फे बैलगाडी रॅली काढण्यात आली होती. या रॅलीचा समारोप जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालया समोर काँग्रेसच्या महिला पदाधिकार्यांनी रस्त्यातच गॅस सिलेंडर उलटे ठवेून चुल मांडत स्वयंपाक केला. यावेळी केंद्र व राज्य शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येवून जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर जळगाव तालुका काँग्रेस(ग्रामीण) कमिटी अध्यक्ष संजय वराडे, प्रदेश प्रतिनिधी ज्ञानेश्वर कोळी,काँग्रेस कमिटी जिल्हास्तर चिटणीस प्रा. संजय पाटील, उपाध्यक्ष राहुल पाटील, सचिव दिपक पाटील, उपाध्यक्ष मनोज चौधरी, उपाध्यक्ष बापू नेरकर, विष्णू घोडस्वार, विजय पाटील, कैलास पाटील, महिला पदाधिकारी ज्योती वराडे, छाया कारेडे, वासुदेव पाटील, अजय पाटील, रमेश कोळी, गणेश पाटील, आनंदा पाटील आदींच्या स्वाक्षर्या आहेत
जळगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे केंद्र व राज्य सरकारने केलेल्या अवाजवी पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढी विरोधात काँग्रेस भवन ते जिल्हाधिकारी कार्यालयांपर्यंत सायकल रॅली काढण्यात आली. सायकल रॅलीमध्ये जिल्हाध्यक्ष डॉ. अर्जुन भंगाळे, माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील, कार्याध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी व इतर पदाधिकार्यांनी काँग्रेस भवन ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सायकल चालवत नेली. यावेळी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्येकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी केली. यानंतर आंदोलकांनी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांना निवेदन दिले.
राज्य, केंद्र शासनाविरोधात घोषणाबाजी
सजविलेल्या बैल गाडींवर मोटरसायकल ठेवून काँग्रेस भवन ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ही रॅली काढण्यात आली. तालुका काँग्रेस (ग्रामीण) कमिटीद्वारे पेट्राल, डिझेल व गॅर दरवाढी विरोधात रॅली काढून राज्य व केंद्र शासनाचा निषेध करण्यात आला. या अनोख्या रॅलीत पाच बैल गाडींवर काँग्रेसचे कार्येकर्ते बसून जिल्हाधिकारी कार्यालयांत आले होते. ही रॅली पेट्राल, डिझेल व गॅस भाव वाढीमुळे सामान्य जनतेचे मोठ्या प्रमाणात लुट होत असल्याने सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात येत होती. यावेळी मोदी सरकार हाय हाय व फडणवीस सरकार हाय हाय अशा घोषणा यावेळी देण्यात आला.
यांची होती उपस्थिती
रॅलीत सहभागी आंदोलकांनी काँग्रेस सरकारच्या काळातील पेट्रोल, डिझेल, गॅस दर तसेच आताचे दर यांची तुलना केलेले पोस्टर आपल्या गळ्यात टांगले होते. या रॅलीत डॉ. अर्जून भंगाळे,डॉ. राधेश्याम चौधरी, उदय पाटील यांच्या नेतृत्वात निघालेल्या या सायकल रॅलीत सेवादलाचे राजस कोतवाल, श्याम तायडे ,कपिल अहमद, शोयब शेख, बाबा देशमुख,प्रदिप सोनवने ,मनोज सोनवने, जगदीश गाढेपरवेज़ पठाण,,अमजद पठाण आदि सहभागी झाले होते.