काँग्रेसतर्फे स्व. राजीव गांधी यांना अभिवादन

0

भुसावळ। भारताचे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या 26व्या पुण्यतिथीनिमित्त शहर काँग्रेस कमिटीतर्फे योगेंद्रसिंग पाटील यांचे कार्यालयात कार्यक्रम घेण्यात आला. सर्वप्रथम शहराध्यक्ष रविंद्र निकम यांच्याहस्ते राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
यावेळी योगेंद्रसिंग पाटील, रहीम कुरेशी, इस्माईल गवळी, संजय खडसे, संजय नरवाडे, शैलेंद्र नन्नवरे, अनवर तडवी, विलास खरात, रामअवतार, पुष्पा वानखेडे, विजय तुरकेले, आदी कार्यकर्ते उपस्थित होते, असे रहीम कुरेशी यांनी कळविले आहे.

यावल
काँग्रेस कमिटीतर्फे अभिवादन करण्यात आले. शेतकी संघात झालेल्या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे गटनेते प्रभाकर सोनवणे, खलील शाह, शेतकी संघाचे संचालक अमोल भिरुड, काँग्रेस शहराध्यक्ष कदीर खान, अल्पसंख्यंक तालुकाध्यक्ष जलील पटेल, भरत चौधरी, हाजी गफ्फारशाह नगरसेवक मनोहर सोनवणे, सद्दाम शाह, अनिल जंजाळे, राजू पिंजारी आदी उपस्थित होते.

मुक्ताईनगर
येथे काँग्रेस कमिटीतर्फे स्व. राजीव गांधी यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन आदरांजली वाहण्यात आली. यावेळी जिल्हा सरचिटणीस डॉ. जगदिश पाटील, प्रभाकर पाटील, तालुकाध्यक्ष आत्माराम जाधव, जिल्हा सचिव आसिफ खान, इस्माईल खान, ताज मोहम्मद, फिरोज खान, इक्बाल खान, शकिल आझाद, सोपान दुट्टे, शकुर जमादार, नामदेव कांडेलकर, अरुण कांडेलकर, बंटी बोराखेडे, यासिन खान, दिपक चौधरी, किसन जाधव, शिवाजी कांडेलकर, रसुल शहा, सुलेमान शाह, आनंदा कोळी, पवन कांडेलकर, अमोल जैन आदी पदाधिकारी उपस्थित होते.

अंतुर्ली सार्वजनिक वाचनालयात प्रतिमापूजनाचा कार्यक्रम
मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथील सार्वजनिक वाचनालयात संत मुक्ताबाई आणि स्व. राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी एस.ए. भोेई, शरद महाजन, बाबुराव महाजन, जे.एम. महाजन, अनिल वाडीले, विठ्ठल महाजन, पुंडलिक धयाडे उपस्थित होते.