तळोदा। हे वर्ष निवडणुकीच वर्ष असून जिल्हातील तिन्ही पालिका तळोदा, नंदूरबार व नवापूर येथे भाजपाची सत्ता आणत काँग्रेसला जिल्ह्यातून संपविण्याचा संकल्प करा तसेच पालिका निवडणुका जवळ येऊन ठेपल्या आहेत, त्यामुळे आता पूर्ण ताकदीने कामाला लागुण केलेला संकल्प तडीस न्या आणि लवकरच सर्व तालुक्यात संघट्नकात्मक जबाबदारी देण्यात येणार असून पदाधिकार्यांनी भाजपा सरकारची विविध लोकापयोगी कामे सर्वत्र पोहचवावीत असे प्रतिपादन डॉ. विजयकुमार गावीत यांनी भाजपाच्या जिल्हा कार्यकारिणीचा बैठकीत केले.
जिल्हा कार्यकारणी बैठक
येथील वामन बापू मंगल कार्यलयात आज जिल्हा कार्यकारणी बैठक दुपारी 12 वाजता घेण्यात आली पंडीत दीनदयाल उपाध्याय जन्मशताब्दी वर्ष निमित्त भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यकारिणी बैठक भाजपा जिल्हाध्यक्ष खा. डॉ. हिना गावित, माजीमंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित, आ. उदेसिंग पाडवी, लक्ष्मण साहुजी, माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी, ओबीसी सेल राज्यध्यक्ष विजय चौधरी, भाजाप जिल्हा संघटन सरचिटनीस यांच्या प्रमुख उपस्थिती पार पडला. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष तसेच खासदार डॉ हिना गावित यांनी केले.
राज्य, केंद्राच्या योजना जनतेपर्यंत पोहचवा
लक्ष्मण सावजी यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना सांगितले की, भाजप संघटन जगात सर्वात मोठी होण्याकरिता संघटनेने प्रंचड मेहनत घेतली असून केवळ सत्तेसाठी राजकीय पक्ष नाही. तसेच राज्य व केंद्रच्या योजना भाजपा कार्यकर्ते पोहचवत आहेत. पक्ष म्हणजे राजकीय संधी साधू टोळी नको अशी भावना त्यांनी व्यक्त केली. मागील 50-60 वर्ष पासून भ्रष्ट्राचाराची कीड लागली असून त्याचा त्रास आजही होत असून येणार्या काळात पुढील 25 वर्ष भाजपचे सरकार असेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
विविध ठरावांचे वाचन
जिल्हा संघटन सरचिटणीस प्रा ,विलास डामरे यांनी विविध ठराव सर्वाना वाचून दाखविले. जिल्हापदाधिकारी विश्वास मराठे, रुपसिंग पाडवी, डॉ कांतीलाल टाटीया, शैला टीबे, नगरसेवक अजय परदेशी, प्रवीण चौधरी, भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्रसिंग राजपूत, अनिल वसावे, भाजप नवापूर अध्यक्ष एजाज शेख, डॉ स्वप्नील बैसाने, प्रवीणसिंह राजपूत, भाजपा शहराध्यक्ष हेमलाल मगरे, शिरीष माळी, निमेश्चंद्र माळी, महेंद्र वाणी, भगवान मगरे, प्रल्हाद मराठे, चुडामन मराठे, सुधीर पाडवी, यशवंत पाडवी, सुभाष शिंदे, विवेक चौधरी, ईश्वर पाडवी, बबन पाडवी, दीपक चौधरी, अमरसिंग नाईक, संजीव चौधरी, डॉ रामराव आघाडे, आदी उपस्थित होते
बुथ जितो सब जितो
आमदार उदेसिंग पाडवी यांनी उपस्थितांना संबोधीत करतांना सांगितले की, तळोदा नंदूरबार नवापूर निवडणुकीत पक्षाचा कस लागणार आहे. भाजपाचा कार्यकर्ता प्रमुख केंद्र बिंदू असून त्यांना विसरू नका भाजप संघटनात्मक दूष्टीने बैठकांना फार महत्व असून मागील काही निवडणुकीत शिवसेनेला अपेक्षित यश न मिळाल्याने त्यांना स्वबळाची भाषा सेनेकडून केली जात आहे. येणार्या काळात बूथ जितो सब जितो मला निवडण्यात बूथ रचना महत्वाची होती असे पाडवी यांनी स्पष्ट केले.
पालिकांवर भाजपचाच झेंडा
विजय चोधरी यांचे जिल्हातील राजकीय सेटिंग बद्दल उघड भाष्य – आपले लोक काँग्रेसच्या भ्रष्ट्राचाराची चर्चा न करता यांची त्यांच्याशी व त्यांची आपल्याशी सेटींग यांवर चर्चा सुरू असते. सेटिंगची चर्चा आपलेच लोक करतात. मात्र तिन्ही पालिकेत निवडणूकीसाठी खासदार हिना गावित व आमदार डॉ विजय गावित व आमदार उदेसिंग पाडवी यांचा सक्षम नेतृत्वखाली पालिकेत भाजपाच्या झेंडा फडकवल्या शिवाय राहणार नाही असा संकल्प करण्याचे आवाहन केल.