नवी दिल्ली : अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याविरोधात सोशल मीडियातून केलेल्या टिप्पणीविरोधात राहुल गांधी यांच्यावर विशेषाधिकारांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाईची नोटीस राज्यसभा अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांच्याकडे पाठवली आहे. सोशल मीडियावर भाजपकडून सर्वाधिक विखारी प्रचार होत असताना त्याकडे दुर्लक्ष करून अध्यक्षांनी काँग्रेस अध्यक्षांना नोटीस पाठविल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात काँग्रेसने डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर पंप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात निवडणुकीदरम्यान केलेल्या टीकेवरून गोंधळ घातला होता. आता काँग्रेस अध्यक्षांवर अवमानप्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे.
भाजप खासदाराने मांडला होता मुद्दा
भाजपचे राज्यसभेचे खासदर भुपेंद्र यादव यांनी सभागृहात राहुल गांधींविरोधात विशेषाधिकरांचे उल्लंघन प्रकरणी कारवाईचा मुद्दा उपस्थित केला होता. भुपेंद्र यादव यांनी म्हटले होते की, अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अपमानास्पद शब्द वापरले आहेत. गांधी यांनी जेटलींच्या आडनावाच्या इंग्रजी स्पेलिंगमध्ये बदल करुन ते गरळींश्रशू ऐवजी गरळींश्रळश असे लिहीले आहे. यातून जेटलींचा अपमान झाला आहे. याप्रकरणाची दखल राज्यसभा अध्यक्ष यंकय्या नायडू यांनी घेतली. यादव यांच्या प्रस्तावाची तपासणी करण्यात आली आहे. राहुल गांधी लोकसभेचे सदस्य असल्याने ही बाब आमच्या अधिकार क्षेत्रात नसल्यामुळे हे प्रकरण लोकसभा सभापतींकडे पाठवण्यात आले आहे.
अवमानचा बदला अवमान
काँग्रेसने पाकिस्तानी अधिकार्यांसोबत बैठका घेऊन भाजपला हरवण्याची रणनिती आखली होती. या बैठकीत मनमोहन सिंग देखील उपस्थित होते असा आरोप आरोप गुजरात विधानसभा निवडणुकीदरम्यान मोदींनी केला होता. त्यानंतर, अरुण जेटली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बचावासाठी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात स्पष्टीकरण दिले होते. अशा प्रकारे आपल्या वक्तव्यांवरून पलटी खाणार्या मोदींची पाठराखण करणार्या जेटलींवर ट्विटरवरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी टीका केली होती. ट्वीटमध्ये त्यांनी गरळींश्रशू ऐवजी गरळींश्रळश असा बदल करुन पंतप्रधान जे बोलतात त्याचा अर्थ तसा नसतो याची आठवण करुन दिल्याबद्दल जेटलींचे आभार मानले होते. राहुल गांधींचे हे ट्वीट आता भाजपने ताणून धरले आहे. राहुल गांधी यांना पाठविलेल्या नोटीसीवर काँग्रेसकडून येणारी प्रतिक्रिया आता महत्वाची ठरणार आहे.
मोदी, जेटलींवर जीडीपीवरून पुन्हा टीका
2017-18 या आर्थिक वर्षात देशाच्या जीडीपीमध्ये घसरण होऊ शकते, असा अंदाज सांख्यिकी विभागातर्फे वर्तवण्यात आला आहे. यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री जेटली यांच्यावर टीका केली आहे. ग्रॉस डिव्हिसिव्ह पॉलिटिक्स म्हणजे जीडीपी अशी व्याख्या करत राहुल गांधी यांनी मोदी आणि जेटली यांना चिमटा काढला आहे. नव्या गुंतवणुकीत गेल्या 13 वर्षांपासून घसरण आहे. बँक क्रेडिट ग्रोथ 63 वर्षांपासून झालेली नाही. रोजगार निर्मिती 8 वर्षांपासून झालेली नाही, असेही ट्विटमध्ये राहुल गांधी यांनी म्हटले आहे.