रावेर । काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांना जिल्ह्यातील फैजपूर येथे येण्यासंदर्भात माजी आमदार शिरीष चौधरी यांनी निमंत्रण दिले. महाराष्ट्रातील नांदेड येथे निवडणुककामी काँग्रेस पक्षाच्या सभेसाठी खासदार राहुल गांधी आले असता माजी आमदार चौधरी यांनी लोकसभा-विधानसभा निवडणूक दीड वर्षावर येऊन ठेपली असताना खान्देशात काँग्रेसची ताकद वाढविण्यासह जिल्ह्यातील राजकीय विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
अधिवेशनाच्या आठवणींना उजाळा मिळणार
फैजपूर येथे 1935 मध्ये देशातील पहिले ग्रामीण भागात काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन घेण्यात आले होते. त्यावेळी अनेक महान व्यक्तींनी येथे हजंरी लावली होती. खासदार राहुल गांधी निमंत्रण स्वीकारून येथे आल्यास त्या आठवणींनादेखील उजाळा मिळून खान्देशात काँग्रेस पक्ष बळकट होण्यासाठी मदत होणार आहे.
काँगे्रसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांना फैजपूर भेटीचे निमंत्रण देण्यात आले आहे. ते येथे आल्यास पक्षाची ताकद वाढविण्यास मोठी मदत होणार आहे.
– शिरीष चौधरी, माजी आमदार