काँग्रेस जनसंघर्ष यात्रेला माजी मुख्यमंत्र्यांसह अनेक पदाधिकार्‍यांची उपस्थिती

0

फैजपूरात माजी आमदारांनी घेतली प्रमुख पदाधिकार्‍यांची आढावा बैठक

फैजपूर- महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश कमिटीतर्फे उत्तर महाराष्ट्र विभागात जनसंघर्ष यात्रा 4 ऑक्टोबर रोजी काढण्यात येणार असून ही ऐतिहासिक जनसंघर्ष यात्रा फैजपूर शहरातील धनाजी नाना महाविद्यालयाच्या प्रांगणातून सुरू होणार आहे. या कार्यक्रमास लोकसभा विरोधी पक्ष नेते मल्लिका अर्जुन खरगे, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस प्रदेश अध्यक्ष माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, युवक काँग्रेस प्रदेश अध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या सह आमदार, पदाधिकारी व प्रदेश, जिल्हा, तालुक्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रमुख पदाधिकार्‍यांंची आढावा बैठक फैजपूर येथे झाली. माजी आमदार शिरीष चौधरी, माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, जिल्हाध्यक्ष संदीप भैय्या पाटील यांनी आढावा घेतला.

यांची बैठकीला उपस्थिती
या बैठकीला यावल पंचायत समितीचे माजी सभापती लिलाधार चौधरी, उपनगराध्यक्ष कलिम मणियार, नगरसेवक देवेंद्र बेंडाळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती केतन किरंगे, सुरेश पाटील, रवींद्र निकम, वसीम तडवी, रीयाज शेख, दिलरुबाब तडवी, प्रभात चौधरी, प्रा.डॉ.व्ही.आर.पाटील, प्रा.डॉ.आर.एल.चौधरी, बबन तायडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.