काँग्रेस जिल्हा उपाध्यक्षांवर चाकू हल्ला

0

यावल । तीन वर्षाुर्वी यावलला तबलिकी इज्तेमाचे आयोजन केल्याचा राग बाळगत एका माथेफीरूने कॉग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष हाजी शब्बीर खान मोहमंद खान (72)यांच्यावर चाकु हल्ला केला गुरूवारी सकाळी ही घटना घडली जखमी अवस्थेतदेखील हाजी शब्बीर खान यांनी शांतता राखण्याचे अवाहन केलेे त्यांच्यावर भुसावळ येथील खाजगी इस्पितळात उपचार सुरू आहे.

हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात
21 मार्च 2014 रोजी शहरात तबलीकी इज्तेमा पार पडला होता याचे नियोजन हाजी शब्बीर खान यांच्याकडे होते या कार्यक्रमाला मुस्लिम समाजाच्या एका गटाकडून विरोध झाला होता मात्र, खान यांनी सामोपचाराने कार्यक्रम पार पडला होता तेव्हापासून राग असलेल्या रफीक खान निसार खान (40,रा. बाहेरपूरा ) यांने हाजी शब्बीर खान नगिना मशिदीजवळ येत असतांना चौकातचं कंमरेजवळ चाकूने वार केला त्यांच्यावर हल्ला होत असल्याचे पाहुन हाफेज खान (रा. इस्लामपूरा) हा मदतीला धावला त्यालादेखील किरकोळ दुखापत झाली त्यांना आधी ग्रामिण रूग्णालयात व नंतर भुसावळ येथे एका खाजगी रूग्णालयार्त दाखल करण्यात आले खान यांच्या फियार्र्दीवरून गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले आहे तपास पो. नि. बळीराम हिरे ,सपोनि योगेश तांदळे, पांडूरंग सपकाळे, संजीव चौधरी करीत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस ठाण्यात मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळली होती व नंतर भुसावळ दवाखान्यात देखील सर्व धर्मिय चाहत्यांनी विचारपूस करीता गर्दी केली होती.