काँग्रेस नेते शिवराज पाटलांना हादरा

0

मुंबई : माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांच्या मुलाच्या कंपनीवर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. शैलेश पाटील यांच्या एनव्ही ग्रुप या कंपनीवर आयकर विभागाने धाड टाकली आहे. ही धाड मोठी असल्याचे समजले जात आहे. तसेच या धाडीमुळे शिवराज पाटील अडचणीत येण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

आयकर विभागाने केलेल्या कारवाईत एक कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. शैलेश पाटील यांच्यावर बोगस शेअर कॅपिटल गोळा केल्याचा आरोप आहे. तसेच परदेशातल्या खोट्या कंपन्यांत पाटील यांनी पैसे गुंतवल्याचेही म्हटले जात आहे.

एनव्ही ग्रुप या कंपनीवर दिल्लीच्या आयकर विभागाने कारवाई केली. शैलेश शिवराज पाटील हे एनव्ही ग्रुपचे डायरेक्टर, इन्व्हेस्टर आहेत. आयकर विभागाने केलेल्या कारवाईत पंजाब, दिल्ली, चंडिगढमधील कार्यालयांवर छापे टाकण्यात आले आहेत. दरम्यान या कारवाईत एक कोटी रुपयांची रोकड इनकम टॅक्स विभागाने जप्त केली आहे.