नवी मुंबई । आगामी काळात महाराष्ट्र राज्यात काँग्रेस पक्षाच्या जिल्हानिहाय संघटनात्मक निवडणुका होणार असून या प्रक्रियेद्वारे त्या त्या जिल्हयातील जिल्हाध्यक्ष, जिल्हा कार्यकारिणी, ब्लॉक अध्यक्ष व प्रदेश प्रतिनिधी हे पक्षाच्या नोंदणीकृत झालेल्या सदस्यांमार्फत निवडणूक प्रक्रियेतून नियुक्त होणार आहेत. या निवडणुक प्रक्रियेसाठी महाराष्ट्र प्रदेष काँग्रेस कमिटीवर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडून नेमण्यात आलेल्या सहाय्यक प्रदेष निवडणुक निर्णय अधिकारी अॅड. संगीता जोषी (ग्वाल्हेर, मध्यप्रदेश) यांनी नवी मुंबई शहराच्या विविध ब्लॉकसाठी नेमण्यात आलेल्या तालुका निवडणुक अधिकारी यांच्यासह नवी मुंबई शहरातील सर्व जिल्हा कार्यकारिणी, ब्लॉक अध्यक्ष, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस यांच्यासह विविध सेलचे अध्यक्ष, नवी मुंबईतील काँग्रेसचे कार्यकर्ते यांच्याषी संवाद साधला.
कार्यकर्त्याला संधी मिळावी
आगामी निवडणुक प्रक्रिया ही अत्यंत पारदर्षक व निष्पक्षरित्या करून तळागाळातील काँग्रेस कार्यकर्त्याला संधी मिळावी, ज्याद्वारे सर्व जाती-धर्म पंथ व महिला वर्गातून लोकमतातून जिल्हाध्यक्ष, प्रदेष प्रतिनिधी, ब्लॉक अध्यक्ष व जिल्हा कार्यकारिणी निवडली जाईल असा विश्वास अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने नवी मुंबईतील काँग्रेस कार्यकत्र्यांना दिला. यावेळी उपमहापौर अविनाश लाड, अनिल कौषिक, निवडणुकीतील प्रदेष काँगेसने नियुक्त केलेले तालुका निवडणुक अधिकारी सचिन शिंदे, रविंद्र कोळी, रमेष इंदिसे, सुभाश भानुषाली, प्रदेष पदाधिकारी सुधिर पवार, सुदर्शना कौशिक, चंद्रकला नायडू, पाणी पुरवठा व मलःनिस्सारण समिती सभापती अंजली वाळंज, ठाणे लोकसभा युवक काँग्रेस अध्यक्ष निषांत भगत, अंकुष सोनावणे, सुरेष नायडु, एकनाथ तांडेल, रविंद्र सावंत, विजय वाळंज, इरफान पटेल, काँग्रेस पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.