पुणे । भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल गांधी यांची निवड झाली असून त्यांनी शनिवारी दिल्लीतील पक्ष कार्यालयात अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. त्यांच्या या निवडीनिमित्त पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन येथे कार्यकर्त्यांनी व पदाधिकार्यांनी रांगोळ्या काढून, मिठाई वाटून आणि फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा केला. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने घेण्यात आलेल्या बैठकीत राहुल गांधींच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. यावेळी पुणे शहर अध्यक्ष रमेश बागवे, अॅड.अभय छाजेड, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, रमेश अय्यर, संगिता तिवारी, कमल व्यवहारे उपस्थित होते.