[व्हिडीओ] काँग्रेस भवन गहाण ठेवण्याचा घाट

0

जिल्हाध्यक्षांसाठी महिला शहराध्यक्ष भीक मांगो आंदोलन करणार
जळगाव – ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या काँग्रेस भवनाचा खर्च हा प्रांगणात असलेल्या दुकानांकडुन मिळणार्‍या भाड्यावर भागत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संदीप पाटील यांच्याकडे पैसे नसल्याने त्यांच्यासाठी भीक मांगो आंदोलन करणार असल्याचे काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा अरूणा पाटील यांनी सांगितले.
शहराच्या मध्यवर्ती असलेल्या जिल्हा काँग्रेस भवनाला मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. मात्र गेल्या दशकापासून या भवनाची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. काँग्रेसच्या सत्ताकाळातही हे भवन उपेक्षितच होते. आणि आता तर जिल्हा पदाधिकार्‍यांना विरोधात असल्याचे निमीत्त झाले आहे. या भवनाच्या प्रांगणातच काही दुकानदारांनी अतिक्रमण केले आहे. गेल्या काही दिवसांपुर्वी हे अतिक्रमण महापालिकेतर्फे काढण्यात आले होते. मात्र हे अतिक्रमण आता भवनाला खेटूनच होत आहे. अतिक्रमण केलेल्या दुकानदारांकडुन काँग्रेस भवनाला भाडे देखिल अदा केले जात असल्याची चर्चा होती. दरम्यान आज काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा अरूणा पाटील यांनी या भवनाच्या विषयावरून जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संदीप पाटील यांच्यावर घणाघाती आरोप केला आहे. अरूणा पाटील यांनी सांगितले की, काँग्रेस भवनातील फोन बील, चहाचा खर्च या दुकानांकडुन मिळणार्‍या पैशातुन भागविला जातो. पैसे कमविण्यासाठीच याठिकाणी दुकानदारांना अतिक्रमण करू देण्यात आले आहे. जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संदीप पाटील यांनी पदभार घेतल्यापासून पक्षासह भवनाला देखिल अवकळा आली आहे. त्यांच्याचमुळे जिल्ह्यात काँग्रेसचा एकही आमदार नाही, खासदार नाही, नगरसेवक नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच काँग्रेस भवनाच्या प्रांगणातील दुकाने तात्काळ हटविण्यात यावी अन्यथा याठिकाणी आमरण उपोेषण करण्याचा इशारा महिला शहराध्यक्षा अरूणा पाटील यांनी दिला आहे.