काँग्रेस म्हणजे ‘बेलगाडी पंतप्रधान नरेंद्र मोदी

0

जयपूर । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी जयपूरमध्ये रॅलीला संबोधित करताना सांगितले की, राजस्थान नेहमी इतरांवर आपल्या प्रेमाचा, स्नेहाचा वर्षाव करत असते. इथे शक्ती आणि भक्तीचा संगम आहे. गेल्या अनेक वर्षांपासून देशाला राजस्थानकडून प्रेरणा मिळते. गेल्या चार वर्षांपासून दुपटीने विकास होत आहे. मला 2100 कोटींपेक्षा अधिक योजनांचे उद्घाटन करण्याचे औचित्य मिळाले आहे. हे सर्व प्रकल्प प्रत्येकाच्या जीवनाला सुगम बनविण्यासाठी लाभदायक ठरणार आहेत. आता विकासाची कामे होऊ लागली आहेत. कारण आमचा एकच अजेंडा आहे तो म्हणजे प्रत्येकाचा सर्वांगिण विकास, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उपस्थितांना सांगितले.