पुणे : काँग्रेस पक्षाचा वर्धापनदिन उद्या दि २८ रोजी साजरा होत आहे. यानिमित्ताने पुण्यातील काँग्रेस भवनात संध्याकाळी स्वागत समारंभ आयोजित केला असून त्याचे निमंत्रण सर्वपक्षीयांना दिले आहे. सर्वपक्षीयांमध्ये वैचारिक मतभेद असणे स्वाभाविक आहे, पण त्यातून कटुता येऊ नये याकरिता काँग्रेस पक्षाने गेली काही वर्षे पुण्यात सर्वपक्षीयांना निमंत्रित करण्याचा नवा पायंडा पाडला आहे. याचे अनुकरण एक वर्ष भाजपनेही पुण्यात केले.
सध्या निवडणुकांचे वातावरण असल्याने आणि त्यातही आघाडी चर्चा होत असल्याने यंदा काँग्रेसच्या वर्धापनदिनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते जास्त संख्येने हजेरी लावतील. राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड या तीन राज्यात काँग्रेसला यश मिळाल्यानंतर गेली चार वर्षे काँग्रेस भवन अथवा पक्षाच्या कार्यक्रमांना न फिरकणारे स्थानिक पुढारी काँग्रेस भवनावर अलिकडे गर्दी करू लागले आहेत. त्यामुळे यंदा स्वागत समारंभाला स्वपक्षीयांचीही गर्दी काँग्रेस भवनात दिसेल.
हे देखील वाचा