केपटाउन । दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसर्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने बॉल टॅम्परिंग केले. यामुळे स्मिथला कर्णधारपदावर पाणी सोडावे लागले. राजस्थान रॉयल्सच्या कर्णधारपदावरून पण त्याची हकालपट्टी करण्यात आली. आता त्याच्यावर आजीवन बंदीची टांगती तलवार आहे. पण नुकताच एक धक्कादायक खुलासा याप्रकरणी झाला आहे. आजच्या सामन्यात बॉल टम्परिंग होऊ शकते, अशी पूर्वसूचना दक्षिण आफ्रिकेचे माजी जलद गोलंदाज फॅनी डिव्हिलिअर्स यांनी टीव्ही क्रूला दिली होती. यावर प्रकाश टाकताना डिव्हिलिअर्स यांनी सांगितले, की सामन्यात ऑस्ट्रेलियन गोलंदाजाची हालचाली या संशय निर्माण होईल, अशा होत्या. मला ते जाणवले. मी टीव्ही क्रूला ऑस्ट्रेलियन गोलंदाज चेंडूशी छेडछाड करू शकतात. त्यामुळे त्यांच्यावर नजर ठेवा, असे सांगितल्याचा खुलासा त्यांनी केला. उल्लेखनीय म्हणजे फॅनी डिव्हिलिअर्स हे या सामन्याचे समालोचन करत होते. एका रेडिओला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा खुलासा केला. न्यूलँडच्या खेळपट्टीची त्यांना चांगली जाण आहे. फॅनी डिव्हिलिअर्स यांनी सांगितल्याप्रमाणे ऑस्ट्रेलियन संघाने चेंडूशी छेडछाड केली. त्यामुळे 30 व्या ओव्हरमध्येच चेंडूला रिव्हर्स स्विंग मिळण्यास सुरुवात झाली. तुम्ही बॉल टॅम्परिंग केली तर चेंडू लगेच स्विंग होण्यास सुरुवात करतो, अशी माहिती त्यांनी दिली. त्यामुळे मला संशय आला आणि टीव्ही क्रूला मी पूर्वसूचना दिली, असे ते म्हणाले.
कॅमेरामन जोटानी ऑस्कर याने आपल्या कॅमेर्यात बॅनक्रॉफ्ट बॉलशी टेम्परिंग करत असल्याचे अचूक टिपले आणि इथेच ऑस्ट्रेलियाचा पर्दाफाश झाला. या सर्व प्रकाराबाबत बोलताना डिव्हिलियर्स म्हणाला की, आम्ही कॅमेरामनला सांगितले की, ते लोक चेंडूवर नक्कीच काहीतरी लावत आहेत. कारण गवत असलेल्या खेळपट्टीवर एवढ्या लवकर चेंडू रिव्हर्स स्विंग होत नाही. ही काही पाकिस्तानी खेळपट्टी नाही की जिथे प्रत्येक सेंटीमीटरवर खेळपट्टीवर चिरा असतील. डिव्हिलियर्सच्या मते, हा सर्व प्रकार उघड करण्यासाठी कॅमेरा क्रूला तब्बल एक तास डोळ्यात तेल टाकून ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंवर नजर ठेवावी लागली. त्यानंतर हा प्रकार कॅमेर्यात कैद झाला.
लेहमनच दोषी
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मायकल क्लार्क याने या संपूर्ण प्रकरणात डेरेन लेहमन हेदेखील समप्रमाणात दोषी असल्याचे म्हटले आहे. कोचला या प्रकरणाची माहिती नसेल तर तेही या प्रकरणात तितकेच दोषी आहेत जितके स्टिव स्मिथ, टीममधील बाकी खेळाडू असे क्लार्कने म्हटले आहे.
ऑस्ट्रेलिया संघाचे प्रशिक्शक डेरेन लेहमन यांना बॉल कुरतडल्या प्रकरणी क्लीन चीट मिळालीय. परंतु, अनेकांनी याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. लेहमन यांनी कोणत्याही किंमतीत जिंकायचेच अशी जी मानसिकता संघामध्ये निर्माण केली, त्यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. लेहमन यांना क्लीन चीट दिल्यानंतर माजी इंग्लिश क्रिकेटर केविन पीटरसन यानंही एक ट्वीट करून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेम्स सदरलँड यांनी पत्रकार परिषदेत बोलताना याप्रकरणी कर्णधार स्टीव स्मिथ, उप कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि सलामीवीर कॅमरून बॅनक्रॉफ्ट यांच्या क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या आचार संहितेच्या उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळल्याचे म्हटले आहे. त्यांना कसोटी मालिकेमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. टीम पेन कर्णधारपदी कायम राहणार आहे, तर मुख्य प्रशिक्शक डेरेन लेहमन यांना क्लीन चिट देण्यात आली आहे. जेम्स सदरलँड यांनी या संपूर्ण प्रकरणाबद्दल माफीही मागितली. या प्रकरणात लेहमन यांनाच या प्रकरणासाठी जबाबदार मानले जात आहे. त्यांच्यावर संघामध्ये दूषित संस्कृती भरण्याचा आरोप केला जातो आहे. याचमुळे आज ऑस्ट्रेलियाच्या संघावर संघावर तोंड लपवण्याची वेळ आली असल्याचे मानले जात आहे.
आयपीएलमधूनही हकालपट्टी
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसर्या कसोटी सामन्यात चेंडूशी छेडछाड प्रकरणी ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने स्टीव्हन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यावर एक वर्षाची बंदी घातली आहे. त्यातच आता बीसीसीआयनेही दोघांविरुद्ध कडक कारवाई केली आहे. या दोघांना यंदाच्या आयपीएलमध्ये खेळता येणार नाही, असा निर्णय बीसीसीआयने जाहीर केला आहे. त्यामुळे राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांना मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाने स्मिथ आणि वॉर्नर यांच्यावर एका वर्षाची बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर हे काळे कृत्य करणार्या कॅमेरुन बेनक्रॉफ्टवर नऊ महिन्यांची बंदी घालती आहे. यापूर्वी आयसीसीने स्मिथवर एका कसोटी सामन्याची बंदी घातली आहे. त्याचबरोबर त्याच्या मानधनातील 100 टक्के रक्कम दंड म्हणून कापण्यात येणार आहे. आयसीसीने बेनक्रॉफ्टला तीन डिमेरिट गुण दिले आहेत. त्याचबरोबर त्याच्या मानधनातील 75 टक्के रक्कम दंड म्हणून कापण्यात येणार आहे.