शिमला । कांगारूचा संघ बदला त्यामुळे ते ही बदले असतील असे मला वाटत होते.मात्र तसे झाले नाही.या संपूर्ण मालिकेत मी कांगारू संघाचा सर्वात मोठा शत्रु होतो. त्यांनी माझ्यावर वेगळ्या पध्दतीने निशाणाही साधला.भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेदरम्यान अनेक कटू अनुभव समोर आले आहेत. पण मी आता ऑस्ट्रेलियन खेळाडूंना मित्र मानत नाही, असे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली म्हणाला.
भारताने कांगारूसोबत सुरू असलेली कसोटी मालिका 2-1 ने जिकली असता पत्रकारांशी विराट विचारले की, स्टीव्ह स्मिथ व कांगारू संघ अजूनही तुझे मित्र आहेत का? यावर विराटने स्पष्ट उत्तर दिले की आता पहिल्यासारखे नाही.मी आधी असाच विचार करायचो, पण आता सगळे बदलले आहे. खेळाच्या वातावरणात तुम्हाल प्रतिस्पर्धी म्हणून खेळायचे असते. पण मी साफ चुकीचा ठरलो. यापुर्वी पहिल्या कसोटीनंतर मी जे म्हटले होते त्याबाबत मी पुर्णत: चुकीचा सिध्द झालो त्यामुळे यावर पुन्हा बोलणार नाही.
या संपूर्ण मालिकेत मी प्रतिस्पर्धी संघाचा सर्वात मोठा शत्रू होतो.
माझ्यावर वेगळ्या पद्धतीने निशाणाही साधला. मालिकेत माझी कामगिरी फारशी चांगली नव्हती. आता टीकाकारांना माझ्याविरोधात बोलण्याची पूर्ण संधी मिळाली असेल. पण मला यामुळे काहीही फरक पडत नाही.याशिवाय विराट कोहलीने ऑस्ट्रेलियन मीडियाचाही क्लास घेतला. घरात बसून ब्लॉग लिहिणं किंवा माईकवर बोलणे सोपे असते. पण मैदानात येऊन सामना करणं अतिशय कठीण असते, असे तो म्हणाला.डीआरएस वादादरम्यान विराट कोहलीने ऑस्ट्रेलियन कर्णधाराला ‘खोटारडा’ म्हटले होते यानंतर ऑस्ट्रेलियन मीडिया आणि काही खेळाडूंनी कोहलीला टीकेचं लक्ष्य केलं. ते सातत्याने कोहलीवर निशाणा साधत होते. ऑस्ट्रेलियन मीडियाने तर कोहलीची तुलना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी केली होती.