कांचनगंगा सर करण्याचा मानस

0

पुणे । जगातील सर्वाधिक उंचीचे एवरेस्ट शिखर सर केल्यानंतर पुण्याचा गिर्यारोहक हर्षद राव आता कांचनगंगा हे जगातील सर्वात उंच शिखर सर करण्यास उत्सुक आहे. 29 वर्षीय हर्षदने 2016मध्ये माउंट एवरेस्ट पादाक्रांत केले होते. विशेष म्हणजे वैयक्तिक मोहिमेत त्याने हे यश मिळविले होते. आता 8586 मीटर उंचीचे माउंट कांचनगंगा वैयक्तिक मोहिमेतून सर करण्याचा निर्धार त्याने केला आहे.

महाराष्ट्रातील गिर्यारोहाकाने कांचनगंगा शिखर सर करण्यासाठी राबविलेली ही पहिलीच वैयक्तिक स्वरूपाची मोहीम असेल. माउंट कांचनगंगा सर केल्यास नागरिकाने वैयक्तिक मोहिमेतून अशा प्रकारचे यश मिळविणारा हर्षद हा देशाचा गिर्यारोहण इतिहासातील पहिलाच नागरिक ठरू शकतो. हर्षद म्हणाला की, पुढील वर्षी एप्रिल-मे या महिन्यात मी या मोहिमेला प्रारंभ करणार आहे. या मोहिमेत ‘लाइव्ह लोकेशन टॅकिंग’ या प्रणालीचा उपयोग करणार आहे. त्यामुळे शिखर सर करतानाचे सर्व लाइव्ह अपडेट पहाता येणार आहे. अशा प्रकारचा गिर्यारोहणातील प्रयोग देशात प्रथमच होणार आहे.