जळगाव : कांचननगरातील उषा अशोक सपकाळे यांना काही वर्षांपूर्वी कसायाकडे गायीचे साह ते आठ महिन्यांचे पिल्लु आल्याचे समजले होते. उषाबाई यांनी ते पिल्लु सांभळण्याचा निर्णय घेवून कसायाकडून ते पिल्लु खरेदी केले. त्या पिल्लुला मोठ्या प्रेमाने व मायेने त्यांनी आपल्या मुलांप्रमाणे वाढीस लावले आहे. त्या पिल्लाचे नामकरण गौरी असे उषाबाई यांनी केले आहे. आता त्यांनी सांभाळलेल्या गौरीला लवकरच वासरू होणार आहे. गौरीला वासरू होणार असल्याने सपकाळे परिवारत आनंदाचे वातावरण तयार झाले आहे.
उषाबाई यांनी एक मलगा व तीन मुली आहेत. आपल्या घरातील एक बनलेली गौरी आता माता बनणार असल्याने सपकाळे कुटूंबाने तीचे डोहाळे पुरविण्याचे ठरविले. त्यानुसार त्यांनी शुक्रवार 23 डिसेंबर रोजी आपल्या मुली ज्योती शैलेंद्र सोनवणे, मानसी पवन सोनवणे, सोनाली देवेंद्र सोनवणे व परिसारातील इतर महिलांकडून गौरीची ओटी भरली. या अनोख्या कार्यक्रमात महिलांनी डोहाळेची गाणी म्हणून आपला आनंद साजरा केला. उषाबाई यांनी या जमलेल्या महिलांसाठी चहापानाचा व लहान मुलांना चॉकलेटचे वाटप करून आपला आनंद साजरा केला. या अनोख्या डोहाळे जेवणाला परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.