जळगाव (कमलेश देवरे) । शद्रासह शहरातल्या शनिपेठतील कांचन नगर भागात नाले सफाई होत नसल्याने नागरिकाचे आरोग्य धोक्यात आले आहे. संपूर्ण वॉर्ड हा घाणीच्या विळख्यात अडकल्याने नागरिकांनी याबाबत लोकप्रतिनिधीच लक्ष नसल्याची तक्रार दिली आहे. महापालिका अधिकारी देखील याभागा कडे दुर्लक्ष करीत असल्याची येथून बोंब उठत आहे. लहान गटारीचे रूपांतर नाल्यामध्ये झाले असून वेळेवर साफ सफाई होत नसल्याने नागरिकांनी जनशक्तीशी बोलताना आपली व्यस्था मांडली आहे.
मागासलेल्या भागाकडे दुर्लक्ष
नाल्याचे पाणी संपूर्ण रस्त्यावर येत असून नागरिकांना चालण्यासाठी रस्ते शिल्लक नसल्याने हाल होत आहे. याबाबत महापालिका प्रशासनाने तात्काळ दखल घेण्याची मागणी होत आहे. जळगाव महापालिके कडून स्वच्छ शहर करण्याचे सांगण्यात येत आहे. मात्र मागासलेल्या भागाकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याची नागरिक तक्रार करीत आहे. महाराष्ट्र शासनकडून स्वच्छ शहर हि योजना राबविण्यात आली. महापालिकेने देखील जळगाव शहरात अभियान राबविल्याचा दावा केला मात्र यामध्ये शहराचे मागासलेले काही भाग वंचित राहिले.
कांचन नगर भागात नेहमीच सुविधां बाबत ओरडणे असते. महापालिका फक्त आपले शहर सुंदर शहर चा नारा देत मात्र तसे प्रत्यक्षात माहीत नसल्याचे पुरावे आहेत. स्वच्छ जळगाव शहराचा दावा महापालिका पप्रशासनाचा फोल ठरत असल्याचे या समस्येतून स्पष्ट होते आहे.
– धनराज चौधरी
आम्ही निवडणुकी मध्ये मतदानाचा हक्क बजावला आहे. मात्र आम्हाला सुविधा मिळत नाही. महापालिका आमच्या कडून मोठ्या प्रमाणात कर आकारण्यात येत असून फुकट पैसे आमच्या कडून घेतले जातात नगरसेवकांनी लक्ष दिल्यास सुविधा शक्य आहे.
– कमलबाई पाटील
वॉर्डात नगरसेवकांचे दुर्लक्ष झाले आहे. याबाबत महापालिका प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. नाल्याचे संपूर्ण पाणी रस्त्यावर येत आहे. गल्लीत लहान मुले असतात यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. साफ सफाई करण्याची गरज आहे.
– आनंदा चौधरी