रावेर । तालुक्यातील कांडवेल येथील सरपंचपदी प्रभाकर भीमराव पाटील यांची निवड झाली आहे. कांडवेल ग्रामपंचायतच्या रिक्त झालेल्या सरपंचपदावर 18 रोजी निवडणूक घेण्यात आली. या पदासाठी प्रभाकर पाटील आणि सोपान गोविंदा धनगर यांनी उमेदवारी अर्ज भरला. या सरपंचपदाच्या निवडणुकीत प्रभाकर पाटील यांच्या बाजूने चार सदस्यांनी मतदान केल्याने माजी सरपंच सोपान धनगर यांचा एक मताने पराभव केल्याने प्रभाकर पाटील यांच्या निवड झाल्याची घोषणा निवडणुक निर्णय अधिकारी आर.ए. तडवी यांनी केली. सहकार्य म्हणून भोयर, ग्रामसेवकदिपक कोसोदे यांनी काम पाहिले. यावेळी उपसरपंच रेखा धनगर, सदस्य अनिता पाटील, ज्ञानेश्वर वानखेडे यांसह शेषराव पाटील, शंकर कोळी, डी.एस. पाटील, पी.एन. पाटील, वसंत पाटील, गोपाळ पाटील, दादाराव पाटील आदी ग्रामस्थांनी नवनिर्वाचित सरपंच पाटील यांचे अभीनंदन केले. गावातील जिल्हा परिषद शाळा गाव स्वच्छता, आरोग्य, रस्ते, गटारींची समस्या सोडविणार असल्याचे नवनिर्वाचित सरपंच प्रभाकर पाटील यांनी जनशक्तीला सांगितले.