चाळीसगाव । येथील कांदा उपबाजाराला दोन वर्षात झळाळी आली असतांना कांदा व्यापारी अरुण आहिरे यांनी शेतकर्यांकडून कांद्या खरेदी केला. मात्र त्याबदल्यात दिलेले. धनादेश परत आल्याने आज बाजार समितीच्या सचिव जगदीश लोधे यांच्या कार्यलयाला घेराव घातला आहे. याबाबतची सविस्तर हकीकत अशी की, चाळीसगाव बाजार समितीच्या आवारात गेल्या दोन वर्षांपासून कांदा लिलाव सुरू करण्यात आलेला होता, त्याला भरघोस प्रतिसाद मिळाला. येथील कांदा खरेदी करणारे अरुण मोतीलाल आहिरे भाजीपाला आडत दुकान यांनी सुमारे 100 शेतकर्यांचा 3 हजार क्विंटल कांदा 1 फेब्रुवारी पासून विकत घेतला. मात्र त्याबदल्यात दिलेले महाराष्ट्र बँकेचे धनादेश परत आले. शेतकर्यांनी अनेकदा तगादा लावूनही पैसे न मिळाल्याने अखेर शेतकर्यांनी ठिय्या मांडला आहे. या विषयाची शहरात जोरदार चर्चा घडत असून बाजार समितीच्या प्रशासनाने सदर व्यापार्यांचा परवाना रद्द करण्याची कारवाई केल्याची माहिती दिली आहे.