मुंबई: केंद्र सरकारने कांदा निर्णयात बंदीचा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे अगोदरच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत कांदा निर्यात बंदीमुळे अधिक भर पडली आहे. विरोधी पक्षाने यावर केंद्र सरकारला लक्ष केले आहे. दरम्यान राष्ट्रवादीतून भाजपात गेलेले राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्र सरकारला कांदा निर्णयात बंदीवरून घरचा आहेर दिला आहे.
केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाने सरकारला दिलेला कांदा निर्यातबंदीचा प्रस्ताव हा कोरोनाच्या संकटकाळात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना धक्कादायक आहे. बाजारातील कांद्याच्या वाढत्या किमतींच्या आधारावर केंद्र सरकारने केलेली निर्यात बंदी ही शेतकऱ्यानां उद्ध्वस्त करणारी आहे. @PiyushGoyal pic.twitter.com/938qmNlC3p
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) September 15, 2020
‘केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाने सरकारला कांदा निर्णयात बंदीचा प्रस्ताव दिला आहे. कोरोनामुळे संकटात असलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही धक्कादायक बाब आहे. बाजारातील कांद्याच्या वाढत्या किंमतीच्या आधारावर केंद्र सरकारने केलेली निर्यात बंदी ही शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारी आहे’ असे खासदार उदयनराजे यांनी म्हटले आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना त्यांनी पत्र दिले आहे. यात त्यांनी ही निर्यात बंदी उठविण्यात यावी अशी मागणी केली आहे.
'केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाने सरकारला दिलेला कांदा निर्यातबंदीचा प्रस्ताव हा कोरोना काळात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना धक्कादायक आहे. कांद्याच्या वाढत्या किमतींच्या आधारावर सरकारने केलेली निर्यात बंदी ही शेतकऱ्यानां उद्ध्वस्त करणारी आहे.@PiyushGoyalhttps://t.co/HYOReS45uk pic.twitter.com/WIJfilELMP
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) September 15, 2020