पालेभाज्या स्वस्त; कांदा, बटाटा महागला

0

पुणे । गुलटेकडी मार्केटयार्ड येथे आज भाज्यांची आवक वाढली. गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर ओसरल्यामुळे आवक वाढली आहे़ श्रावण महिन्यात मांसाहार वर्ज्य केला जातो. त्यामुळे भाज्यांना मागणी वाढली आहे. तरकारी विभागात 170 ते 180 ट्रक इतकी आवक झाली आहे. दरम्यान आवक चांगली झाली असल्याने टोमॅटो, काकडी, प्लॉवर, शिमला मिरची आणि मटारच्या दरात घट झाली आहे. कांदा आणि बटाट्याच्या दरात मात्र वाढ झाली असल्याचे व्यापार्‍यांनी सांगितले.

परराज्यातून मार्केटयार्डत मोठ्याप्रमाणावर मालाची आवक झाली. कर्नाटकातून 600 ते 700 पोती मटार, गुजरात आणि कर्नाटकातून कोबीची 10 ते 12 ट्रक, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडुतून 4 ते 5 टेम्पो शेवगा, गुजरात आणि कर्नाटकातून 14 ते 15 टेम्पो हिरवी मिरची, इंदौरहून 7 ते 8 ट्रक गाजर इतकी आवक झाली आहे. तर स्थानिक मालामध्ये सातारी आले 2000 ते 2200 गोणी, कोबीची 10 ते 12 टेम्पो, फ्लॉवरची 18 ते 20 टेम्पो, सिमला मिरचीची 15 ते 16 टेम्पो, तांबडा भोपळा 10 ते 12 टेम्पो, भुईमुग शेंग 200 ते 225 पोती, टोमॅटो चार ते साडेचार हजार पेटी, पुरंदर, पारनेर, वाई आणि सातारा येथून मटारची 500 गोणी, कांदा 125 ते 150 ट्रक, इंदौर, आग्रा, गुजरात आणि तळेगावहून बटाट्याची 500 ट्रक, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून लसणाची पाच ते साडेपाच हजार गोणींची आवक झाली आहे.

पालेभाज्यांचे दर घसरले
छत्रपती शिवाजी महाराज मार्केटयार्ड गुलटेकडी येथे पालेभाज्यांचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले आहेत. पालेभाज्यांची आवक मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे रविवारी दर घसरले.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव :
कांदा : 120-150, बटाटा : 70-90, लसूण : 200-450, आले सातारी : 180-200,
भेंडी : 300-350, गवार : गावरान व सुरती 300-400, टोमॅटो : 300-350, दोडका :
200-300, हिरवी मिरची : 300-400, दुधी भोपळा : 60-120, चवळी : 200-300, काकडी : 120-180, कारली : हिरवी 250-300, पांढरी : 200-220, पापडी : 300, पडवळ : 200-250, फ्लॉवर : 60-100, कोबी : 60-100, वांगी : 150-220, डिंगरी : 200-250, नवलकोल : 100-140, ढोबळी मिरची : 200-250, तोंडली : कळी 200-220, जाड : 90-100, शेवगा : 400-500, गाजर : 140-160, वालवर : 350-400, बीट : 140-160, घेवडा : 300-500, कोहळा : 100-150, आर्वी : 200-300, घोसावळे : 150-200, ढेमसे : 180-200, भुईमूग शेंग : 300-400, मटार : परराज्य : स्थानिक : 400-500, पावटा : 300-350, तांबडा भोपळा : 60-100, सुरण : 250-300, मका कणीस : 60-100, नारळ (शेकडा) : 1000-1600.

पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव :
कोथिंबीर : 200-500, मेथी : 300-600, शेपू : 200-400, कांदापात :
800-1000, चाकवत : 400-500, करडई : 400-500, पुदिना : 200-300, अंबाडी
: 400-500, मुळा : 800-1000, राजगिरा : 400-500, चुका : 400-500, चवळई :
500-600, पालक : 300-500.