कांदिवली येथे व्याख्यान

0

मुंबई : बौध्द मित्र संघाच्या वतीने इंडियन एज्युकेशन सोसायटी,सेक्टर 2,चारकोप कांदिवली पश्चिम येथे राहुल वारे यांच्या अध्यक्षतेखाली 15 ऑगस्ट रोजी सायं 6 वा.व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय लोकशाही: सद्यस्थीती व आव्हाने या विषयावर अ‍ॅड संघराज रुपवते व्याख्यान देणार आहेत. तर प्रमुख उपस्थितीत प्रा.रमाकांत यादव, सयाजी वाघमारे आदि मान्यवर राहणार असल्याचे माहिती प्रभाकर कदम यांनी दिली.सी.ओ ढिवरे,डॉ तुकाराम थोरात,अरुण साळवी,अशोक कांबळे,रमेश गणवीर,रविंद्र गजभिये,सुनील साळवी,दामू गंगावणे आदि पदाधिकारी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेत आहेत.