चाकण : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महात्मा फुले मार्केट यार्ड वर कांद्याची आवक वाढून भावात घट झाली. बटाट्याची आवक घटून भावामध्ये मात्र वाढ झाली. भूईमुग शेंगांची आवक घटून भाव स्थिरावले तर लसणाची आवक किरकोळीत घटून भावही घटले. एकूण उलाढाल 2 कोटी 85 लाख रुपये झाली. कांद्याची आवक या आठवड्यात 523 क्विंटलने घटली, तर भावात 400 रुपये घट झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत बटाट्याची आवक 30 क्विंटलने घटली तर भावांमध्ये दोनशे रुपये वाढ होऊन भाव 2200 रुपये झाले.
लसणाच्या भावात दोनशे रुपयांची घट…
भुईमूग शेंगांची आवक या सप्ताहात दोन क्विंटल कमी होऊन भाव मात्र 4500 रुपयांवर स्थिरावले. लसणाची आवक या सप्ताहात तीन क्विंटलने घटली तर भावामध्ये दोनशे रुपयाने घट होऊन 1800 रुपये झाले. चाकणमध्ये फळभाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात घटून भाज्यांचे भाव मात्र वधारले. चाकण बाजारात मेथी व कोथिंबिरीचे आवक व भाव वाढले. जनावरांच्या बाजारात म्हशी आणि शेळीमेंढ्यांच्या संख्येत वाढ होऊन भावा मध्येही वाढ झाली. राजगुरूनगर येथील मुख्य बाजारात मेथीची आवक 60000 जुड्या होऊन 251 ते 1850 भाव मिळाला. कोथिंबिरीची आवक 45000 जुड्या झाली. भाव 301 ते 1401 शेपू आवक 8000 जुड्या झाली 400 ते 1150 रुपये भाव मिळाला.