कांबळे कुटुंबीयांना मिळाला न्याय

0

पनवेल । पनवेल परिसरातील जमिनींचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यातच मोठमोठ्या जाहिराती झळकावून कमी किमतीत घरे देण्याच्या भूलथापा देऊन सर्वसामान्यांना लाखो रुपयांचा गंडा बांधकाम व्यावसायिक घालत आहेत. आदई येथील कांबळे कुटुंबियांची राहती घरे विकत घेऊन 50-50 या तत्वावर जागा घेऊन इमारत उभारतो असे सांगुन भामट्याने फसवणूक केली होती. या भामट्या बांधकाम व्यावसायीकाकडून जागा सोडवून ती जागा पुन्हा कांबळे कुटुंबियांच्या नावे करून देण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते संतोष भगत यांनी घेतलेल्या अथक परिश्रमामुळे हे सारे शक्य झाले आहे. त्यामुळे कांबळे कुटुंबीयांनी आदई गावात बॅनरबाजी करून आभार मानले आहेत.