रावेरकरांसह युवा शक्ति फाउंडेशनतर्फेही शुभेच्छांचा वर्षाव
रावेर- दक्षिण कोरीयात झालेल्या स्पर्धेत अजंदे येथील मूळ रहिवासी व मुंबई महापालिकेतील अग्निशामक दलातील कर्मचारी जीवन पाटील याने रीले प्रकारात कांस्यपदक मिळवल्यानंतर त्याचा रावेर येथे तहसीलदार विजयकुमार ढगे व रावेर विकास युवा शक्ति फाउंडेशनतर्फे सत्कार करण्यात आला.
सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव
दक्षिण कोरिया येथे झालेल्या 13 व्या फायर-फायटर गेम्स 2018 रिले 4 बाय 100 मीटर या स्पर्धेमध्ये जीवन पाटील यांनी कांस्यपदक पटकावले. जीवन पाटील यांच्या यशाबद्दल आई मीराबाई व वडिल डॉ.उमाकांत पाटील यांचा तहसील कार्यालयात तहसीलदार ढगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी रावेर विकास युवा शक्ति फाउंडेशनचे अध्यक्ष तथा रावेर नगरपालिकेचे उपाध्यक्ष अॅड.सुरज चौधरी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नीळकंठ चौधरी, भाजपा माजी तालुकाध्यक्ष सुरेश पाटील, कोकिळा पाटील, अशोक पाटील, विलास ताठे, पांडुरंग पाटील, ज्ञानेश्वर चौधरी, किरण चौधरी, पंकज चौधरी, अमोल कासार, परेश चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.