पिंपरी-चिंचवड : शहरवासियांची शास्तीची धास्ती 15 दिवसात घालवू या..! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनाचे ’काऊंट डाऊन’ करण्यासाठी विरोधकांनी महापालिका भवनासमोर लावलेला फलक सोमवारी गायब झाला आहे. हा फलक नेमका कोणी गायब केला हे समजले नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नऊ जानेवारीला शहरातील अनधिकृत बांधकामांची शास्ती येत्या पंधरा दिवसात माफ करु असे आश्नासन दिले होते. त्याचे विरोधीपक्षांनी 12 जानेवारीपासून ’काउंट डाऊन’ सुरु केले होते. पिंपरी-चिंचवड शहरवासीयांनो शास्तीकर माफ होतोय….दिवस राहिले 12! असा ’काऊंट डाऊन’चा फलक महापालिका भवनासमोर लावला होता. परंतु, महापालिका भवनासमोर लावलेला ’काऊंट डाऊन’ फलक आज गायब झाला आहे. घोषणेचे 15 दिवस पुर्ण होण्यासाठी केवळ तीन दिवस शिल्लक असताना हा फलक गायब झाला आहे. फलक नेमका कोणी गायब केला हे समजले नाही.