काकनबर्डी यात्रा परीसरात विद्यार्थ्यांकडून स्वच्छता मोहिम

0

भातखंडे । येथून जवळ असलेल्या काकनबर्डी येथे नुकत्याच पार पडलेल्या खंडेराव महाराज यांची यात्रोत्सव पार पडली. या यात्रोत्सवात भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळते. दरम्यान यात्रेत येणार्‍या भाविकांकडून मोठ्याप्रमाणावर कचरा व घाण साचली असल्याने यात्रेच्या दुसर्‍या दिवशी येथून जवळ असलेल्या जवाहर हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी परीसरात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. ही स्वच्छता मोहित गेल्या सहा वर्षापासून राबविण्यात येत आहे.

दरवर्षी यात्रा संपल्याच्या दुसरे दिवशी महाविद्यालय बारावीचे तरुण-तरुणी सोबत घेऊन संपूर्ण परिसराची स्वच्छता केली जाते. यावर्षीही यावर्षीदेखील कनिष्ठ महाविद्यालयाच्या 200 विद्यार्थ्यांनी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व परीसरात स्वच्छता केली. यात्रा समितीच्या वतीने विद्यार्थ्यांना भोजन व्यवस्था करण्यात आली. त्यांच्या या कार्याची दखल संस्थेचे चेअरमन प्रतापराव पाटील यांनी घेऊन त्यांचे अभिनंदन केले आहे.