नंदुरबार : वनजमिनीवर खोदलेल्या विहिरीसाठी वीज कंपनीला देण्यासाठी लागणारा ना हरकत दाखला देण्यासाठी पंधराशे रुपयांची लाच मागणार्या काकरदा, ता.शहादा येथील वनपाल रानुदास ममराज जाधव यास गुरुवारी दुपारी शहादा शहरातील बसस्थानकासमोर लाच स्वीकारताच नंदुरबार एसीबीच्या अटक केली. या कारवाईने लाचखोरांच्या गोटात मोठी खळबळ उडाली.
विद्यार्थ्याच्या तक्रारीवरून वनपाल जाळ्यात
धडगाव येथील 25 वर्षीय तक्रारदार असून त्यांच्या कुटुंबांची कंज्यपाणी येथे वनजमीन असून तेथे विहिर खोदलेली आहे. मुख्यमंत्री सौर कृषी पंप या योजनेंतर्गत महावितरण कार्यालयाला वनविभाग काकरदा यांचा ना हरकत दाखला आवश्यक असल्याने तो दाखल मिळण्यासाठी तक्रारदाराने 15 फेब्रुवारी अर्ज केला मात्र आरोपी वनपाल रानुदास ममराज जाधव यांनी तक्रारदाराकडे 17 फेब्रुवारी रोजी दोन हजारांची मागणी केली मात्र पंधराशे रुपयात त्यावेळी तडजोड ठरल्यानंतर एसीबीकडे तक्रार नोंदवण्यात आली. आरोपीने गुरुवारी दुपारी शहादा बस स्थानका समोरील बंग्लोर बेकरी समोर लाच स्वीकारताच पथकाने आरोपीला अटक केली.
यांनी केला सापळा यशस्वी
पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलिस अधीक्षक निलेश सोनवणे, पोलिस उपअधीक्षक विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हा सापळा नंदुरबार एसीबीचे पोलिस उपअधीक्षक शिरीष जाधव यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक जयपाल अहिररराव, महाजन, दीपक चित्ते, संदीप नावडेकर, अमोल मराठे, मनोज अहिरे, ज्याोती पाटील यांनी यशस्वी केला.