काकरदे येथे गुणवंत विद्यार्थी गुणगौरव

0

नंदुरबार। तालुक्यातील काकरदे येथे गुणवंत विद्यार्थी व समाज सेवक नागरिकांचा प्रशस्ती पत्र देऊन गौरव करण्यात आला.प्रकाश फाउंडेशनच्यावतीने या समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सरपंच रवींद्र बागुल हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच प्रकाश माळी, रवींद्र चव्हाण,पोलीस पाटील अनंतराव पाटील होते.या समारंभाला वक्ते म्हणुन एकलव्य स्पर्धा केंद्राचे माजी समनव्यक वीरेंद्र वळवी होत.

मान्यवरांच्या हस्ते दहावी,बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनींचा गौरव करण्यात आला.गावात सामाजिक कार्य करून आदर्श निर्माण करणार्‍या समाजसेवकांचाही सन्मान करण्यात आला यात बचत गटातील महिला ,माळकरी संप्रदाय,आदर्श व्यक्ती, वाहन चालक,यशस्वी व्यक्ती यांचा समावेश होता .यावेळी विरेंद्र वळवी यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की ध्येय डोळ्यासमोर ठेवल्यास यश मिळते. प्रत्येक विद्यार्थ्यांनी ध्येय ठेऊन अभ्यास करावा असे आवाहन वळवी यांनी केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विजय मराठे,पराग माळी यांच्यासह तरुणांनी परिश्रम घेतले.