काकरदे येथे दोन गटात हाणामारी

0

नंदुरबार। राजकीय वादातून दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना नंदुरबार तालुक्यातील काकरदे गावात घडली आहे. या प्रकरणी परस्परविरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या असून दोन्ही गटातील 22 जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की उसनवारीचे 50 हजार रुपये मागितले,याचा राग येऊन पुंडलिक तुकाराम माळी, प्रवीण पुंडलिक माळी, दत्तात्र्यय काशिनाथ माळी, साहेबराव महादू माळी, महादू तुकाराम माळी, राकेश पुंडलिक माळी, देविदास रामदास माळी, दिनेश गुलाब माळी, हिरालाल रामदास माळी, गणेश गुलाब माळी, संजय रामदास माळी, भटु आंनदा माळी, राकेश भाऊराव माळी यांनी लाथा बुक्यांनी व काठीने मारून जखमी केले,अशी फिर्याद मनोहर जगन्नाथ बागुल यांनी दिली आहे. तर दुसऱ्या गटातील शोभाबाई पुंडलिक माळी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ग्रामपंचायतीने तापी नदीवरून पाईप लाईन आणलेली आहे. त्याबाबत विचारणा केल्याचा राग मनात धरून व पैसे मागण्याचा बहाणा करून प्रकाश जगन्नाथ माळी, मनोहर जगन्नाथ माळी, ज्ञानेश्वर जगन्नाथ माळी, जगन्नाथ भिका माळी, पराग ज्ञानेशवर माळी, युवराज शंकर माळी, पुंडलिक शंकर मराठे,महेंद्र पुंडलिक मराठे,प्रवीण ज्ञानेशवर माळी यांच्या सह अन्य 5 जणांनी घरात घुसून लाथा बुक्यांनी व काठीने मारहाण केली,असे फिर्यादीत म्हटले आहे, या दोन्ही गटाने दिलेल्या फिर्यादीनुसार 22 जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा तालुका पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.