काकांप्रमाणे पुनरावृत्ती करुन शेतकर्‍यांची दिशाभुल करण्याचा प्रयत्न थांबवा

0

पाचोरा । माजी आमदार आर.ओ.पाटील यांनी त्यांच्या निवडणुकीपुर्वी गोवोगावी जावून शेतकर्‍यांचे कर्ज माफीचे फॉर्म भरुन घेतले होते. मात्र ते फॉर्म मुंबईपर्यंत न जाता निर्मल सीडस्मध्येच रद्दी म्हणून पडून राहिले त्यांचीच पुर्नरावृत्ती आमदार किशोर पाटील यांनी गेल्या आठवड्यात बेरोजगारांसाठी रोजगार मेळावा आयोजित केला व आता 1 लाख शेतकर्‍यांचे कर्ज माफीचे फॉर्म भरुन शेतकरी व बेरोजगारांची दिशाभुल करण्याचा केवीलवाना प्रयत्न सुरु केला आहे. शिवसेना राज्यात सत्तेत सहभागी असतांना आमदारांना कर्ज माफीचे फॉर्म भरुन घेण्याची कितपत गरज आहे. याशिवाय बेरोजगारांचा मेळावा आयोजित करुन त्यांच्या हाती काहीही लागले नाही. अशी माहिती माजी आमदार दिलीप वाघ यांनी त्यांचे निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

भाजपाची सत्ता असतांना शेतकर्‍यांची कर्जासाठी वणवण : केंद्र शासनाच्या नोटबंदी नंतर राज्यात सत्तेत सहभागी असलेले सेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरेसह अनेक पदाधिकार्‍यांनी नोटबंदीला विरोध दर्शविला कर्जमाफीच्या मुद्यावरुन शासनाच्या विरोधात टिकास्त्र सोडुन सेनेचे मंत्री व आमदारांचे राजीनामे खिशात असल्याचा पोकळ दम दिला. जिल्हा बँकेत आमदार किशोर पाटील हे व्हाईस चेअरमन असतांनाही शेतकरी कर्जासाठी दिशाहीन झालेला आहे. एकतर त्यांनी शेतकर्‍यांना कर्ज पुरवठा करावा नाहीतर व्हाईस चेअरमन पदाचा राजीनामा द्यावा केवळ खुर्चीला चिकटून राहण्याचा प्रयत्न करुन शेतकर्‍यांची दिशाभुल करुन नये. जळगाव जिल्हा बँकेच्या प्रमाणेच नाशिकची जिल्हा बँक तोट्यात असून नाशिक जिल्ह्यातील शेतकर्‍यांना तेथील पालकमंत्री ना.गिरीष महाजन यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांची मनधरणी करुन शेतकर्‍यांसाठी पतपुरवठा करुन घेतला मात्र ना.महाजन हे आपल्याच जिल्ह्यातील असल्याने व जिल्हा बँकेत व्हाईस चेअरमन पदावर आमदार किशोर पाटील हे विराजमान असतांना असे प्रश्‍न का निर्माण होत आहे.

पत्र परीषदेला यांची उपस्थिती
पाचोर्‍याच्या आमदारांनी कोणत्याही शासकीय कंपनीच्या आधिकार्‍यांना न बोलवता बेरोजगार मेळावा आयोजित केला. केवळ 8 ते 10 हजार रुपये पगाराची नोकरी देण्याचे प्रयत्न झाल्याने बेरोजगारांनीच मेळाव्याकडे पाठ फिरवली व आता शेतकर्‍याचे कर्ज माफीचे फॉर्म भरुन शेतकर्‍यांचीही दिशाभुल करण्याचे थांबवावे असेही वाघ यांनी सांगितले. यावेळी विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय वाघ, जिल्हा उपाध्यक्ष शालिग्राम मालकर, जिल्हा प्रवक्ते खलील देशमुख, तालुकाध्यक्ष विकास पाटील, युवकांचे तालुकाध्यक्ष अरुण पाटील, प्रदेश सरचिटणीस नितीन तावडे, पं.स.सदस्य ललित वाघ, डॉ.पितांबर पाटील, अ‍ॅड. दीपक पाटील, विनय जकातदार उपस्थित होते.