जळगाव । गुजरातच्या ठेकेदारकडून संस्थेचे केलेल्या कामाची कागपत्र डॉ. महाजन यांनी फोनवरून सांगितल्यानुसार मनोज लोहार यांच्या कार्यालयात कागदपत्र घेऊन आलो होता. त्यानंतर रात्री पुन्हा डॉ. उत्तमराव महाजन यांनी फोन करून संस्थेचे चेकबुक मनोज लोहार यांच्या कार्यालयात घेऊन येण्याच्या सांगितल्यावर मी चेकबुक घेऊन लोहार यांच्या कार्यालयात आलो. त्यानंतर चेकबुकमधील तीन चेक महाजन यांना दिल्याची दिल्याची माहिती डॉ. उत्तमराव महाजन यांच्या महाविद्यालयातील कर्मचारी नितीन सुकदेव जाधव यांनी शनिवारी न्यायालयात दिली. शनिवारी मनोज लोहार खंडणी प्रकरणी नितीन जाधव यांनी साक्ष व उलटतपासणी घेण्यात आली.
अॅड. केतन ढाके यांनी घेतली साक्ष
चाळीसगाव परिमंडळाचे तत्कालिन अपर पोलीस अधीक्षक मनोज लोहार, उपनिरीक्षक विश्वास निंबाळकर व कर्मचारी धीरज येवले यांच्याविरुध्द दाखल खटल्यात शनिवारी न्या.पी.वाय.लाडेकर यांच्या न्यायालयात डॉ. उत्तमराव महाजन यांच्या महाविद्यालयातील नितीन सुकदेव जाधव याची साक्ष व उलटतपासणी झाली. जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी ही साक्ष घेतली. तर आरोपीपक्षाच्या वकीलांकडून उलटतपासणी देखील घेण्यात आली.
चेकबुकमधून तीन चेक दिले
30 जुन 2009 रोजी डॉ. महाजन यांनी फोनद्वारे संस्थेचे गुजरातच्या ठेकेदाराकडून केलेल्या कामांची कागदपत्र मनोज लोहारच्या कार्यालयात घेऊन ये असे सांगितले. त्यामुळे कागपत्र घेऊन मी लोहार यांच्या कार्यालयात जाऊन महाजन यांना कागदपत्र दिले. त्यानंतर पुन्हा रात्री आठ ते साडे आठ वाजेच्या सुमारास डॉ. उत्तमराव महाजनांचा फोन आला आणि संस्थेचे चेकबुक घेऊन मनोज लोहार यांच्या कार्यालयात येण्याचे सांगितले. त्यानुसार मी लोहार यांच्या कार्यालयात चेकबुक घेऊन आलो व चेकबुकमधील तीन चेक हे डॉ. महाजन यांना दिले. अशी माहिती जाधव यांनी साक्षी व उलटतपासणीत न्यायालयात दिली.
यांनी पाहिले कामकाज
नितीन जाधव यांनी डॉ. उत्तमराव महाजन यांना डांबून ठेवण्यासाठी कोठे-कोठे घेऊन गेले. त्या ठिकाणांची संपूर्ण माहिती न्यायालयात दिली. याप्रकरणी सरकारपक्षातर्फे अॅड. केतन ढाके, फिर्यादीतर्फे अॅड. पंकज अत्रे, अॅड. अविनाश पाटील, संशयित मनोज लोहारतर्फे अॅड. निलेश घाणेकर, अॅड. सुधीर कुळकर्णी, धीरज येवलेतर्फे अॅड. सागर चित्रे, पीएसआय निंबाळकर यांच्यातर्फे अॅड. आर.के.पाटील हे काम पाहत आहेत. दरम्यान, याप्रकरणीचा पूढील कामकाज 22 फेब्रुवारीला होणार असून डिंगबर माळी यांची साक्ष होणार आहे. दरम्यान, शनिवारी जाधव यांच्या साक्षीत व उलटतपासणीत त्यांनी 30 जुन रोजी त्यांच्यासोबतच घडलेल्या घटनेचा उलगडा करत न्यायालयात माहिती दिली. तसेच त्यांनी डांबूल ठेवलेल्या ठिकाणांची माहिती देखील दिली.